पुणे – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व जलशुद्धीकरण केंद्रामध्ये येत्या गुरुवारी (दि.2) रोजी संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा बंद असणार आहे. तसेच शुक्रवारी सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.
जलकेंद्र आणि पाणी पुरवठा बंद असणारा भाग
पर्वती : सर्व पेठा, दत्तवाडी, राजेंद्रनगर, लोकमान्यनगर, डेक्कन जिमखाना, शिवाजीनगर, स्वारगेट, पर्वती दर्शन, पर्वती गाव, मुकुंदनगर, सहकारनगर, एसएनडीटी परिसर, एरंडवणा, संपूर्ण कोथरूड, डहाणूकर कॉलनी, कर्वेनगर, लॉ कॉलेज रोड, सातारा रस्ता परिसर, पद्मावती, बिबवेवाडी, तळजाई, कात्रज, धनकवडी, इंदिरानगर, कर्वे रस्ता, सेमिनरी झोनवरील मिठानगर, शिवनेरीनगर, भाग्योदयनगर, ज्ञानेश्वरनगर, साईबाबानगर, सर्व्हे क्र 42, 46 कोंढवा खुर्द, पर्वती आणि पद्मावती टॅंकर भरणा केंद्र.
वडगाव : हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगाव पठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ, कोंढवा बुद्रुक. चतु:शृंगी, एसएनडीटी
वारजे : पाषाण, औंध, बोपोडी, खडकी, चतु:शृंगी, बावधन, बाणेर, चांदणी चौक, महात्मा सोसायटी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसर, वारजे माळवाडी, रामनगर, अहिरेगाव, पॉप्युलरनगर, अतुलनगर, शाहू कॉलनी, सूस, सुतारवाडी, भूगाव रस्ता, गोखलेनगर, जनवाडी, रेंजहिल्स, किष्किंधानगर, रामबाग कॉलनी, डावी-उजवी भुसारी कॉलनी, धनंजय सोसायटी, एकलव्य कॉलेज, महात्मा सोसायटी, गुरुगणेशनगर
लष्कर : लष्कर भाग, पुणे स्टेशन परिसर, मुळा रस्ता, कोरेगाव पार्क, ताडीवाला रस्ता, रेसकोर्स परिसर, वानवडी, हडपसर, महंमदवाडी, येरवडा, वडगावशेरी-चंदननगर, सोलापूर रस्ता, टिंगरेनगर, धानोरी, लोहगाव, विमाननगर, मुंढवा, विश्रांतवाडी, नगर रस्ता, कल्याणीनगर, हौसिंग बोर्ड कॉलनी, गोंधळेनगर, सातववाडी. विद्यानगर, टिंगरेनगर, कळस, धानोरी, लोहगाव, विमाननगर, नगर रोड.
भामा-आसखेड जलशुद्धीकरण केंद्र : लोहगाव, विमाननगर, वडगावशेरी, कल्याणीनगर, विश्रांतवाडी, फुले नगर, येरवडा.