हडपसर : “कोणी कितीही आरोप केले तरी आमचे कामच त्याचे उत्तर आहे. आम्ही समाजासाठी प्रामाणिक आणि सच्चे कार्यकर्ते म्हणून काम करत असल्यामुळे जनता आमच्या पाठीशी उभी राहते आणि प्रभागातून विजय निश्चित आहे,” असा विश्वास स्थायी समितीचे माजी सदस्य मारुती आबा तुपे यांनी व्यक्त केला. हडपसर-सातववाडी प्रभाग क्रमांक १६ मधील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार मारुती आबा तुपे, शिल्पा नितीन होले, उज्वला सुभाष जंगले आणि संदीप रामचंद्र दळवी यांनी हिंगणेमळा भागात पदयात्रा काढून मतदारांना भाजपला मतदान करण्याचे आवाहन केले.पदयात्रेची सुरुवात काळभैरवनाथ मंदिरात नारळ वाढवून करण्यात आली. नागरिकांनी फटाके फोडून, फुले उधळून आणि औक्षण करून उमेदवारांचे उत्साहात स्वागत केले. काँग्रेसचे काही वरिष्ठ पदाधिकारी गणेश फुलारे, बाळासाहेब हिंगणे, नितीन आरू, हिंगणे ताई नुकतेच भाजपमध्ये प्रवेश करून पदयात्रेत सक्रिय सहभागी झाले आणि मतदारांना पक्षाच्या बाजूने मतदान करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमात भाजप हडपसर विधानसभा अध्यक्ष आकाश डांगमाळी, पुनम हिंगणे, सोनल कोद्रे, सविता हिंगणे, ओंकार ससाणे, नंदा हिंगणे, बाळा शिवरकर, शुभम हिंगणे, गिरीश हिंगणे, रोहन हिंगणे, संतोष वाडकर, दत्तात्रय वाडकर, तेजस फटांगडे, महेंद्र हिंगणे, अक्षय राऊत, शुभम राऊत, संजय रासकर, सुनील टिळेकर, ज्योती इंगळे, प्राजक्ता देसाई आणि इतर पदाधिकारी, कार्यकर्ते व महिलांचा मोठा सहभाग होता.