विविध विभागात देश-विदेशातील १४० चित्रपटांचा घेता येणार आनंद पुणे – पुणे फिल्म फाउंडेशन, सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन आणि दादासाहेब फाळके चित्रनगरीतर्फे २४ वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (पिफ) २०२६ यंदा १५ ते २२ जानेवारी २०२६ दरम्यान होत असल्याची माहिती पिफचे संचालक, ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी पत्रकार परिषदेत दिली. पुणे फिल्म फाउंडेशनचे विश्वस्त डॉ. मोहन आगाशे, विश्वस्त सतीश आळेकर, विश्वस्त सबिना संघवी, ज्येष्ठ चित्रपट समीक्षक आणि चित्रपट निवड समितीचे अध्यक्ष समर नखाते, चित्रपट निवड समितीचे सदस्य अभिजीत रणदिवे, उपसंचालक विशाल शिंदे (प्रोग्रॅम आणि फिल्म), उपसंचालक अदिती अक्कलकोटकर (आंतरराष्ट्रीय संपर्क आणि समन्वय) यावेळी उपस्थित होते. चित्रपट महोत्सवाची यावेळची थीम महान दिग्दर्शक, अभिनेते आणि चित्रपट निर्माते गुरुदत्त यांची जन्म शताब्दी, ही आहे. जागतिक व मराठी चित्रपट स्पर्धात्मक विभाग, ग्लोबल सिनेमा अशा विभागांमध्ये १४० चित्रपट दाखविले जाणार आहेत. चित्रपट महोत्सवाची सुरवात ला ग्राझिया (इटली) या पावलो सोरेंटीनो दिग्दर्शीत चित्रपटाने होणार असून, महोत्सवाच्या शेवटी फादर मदर सिस्टर ब्रदर (अमेरिका, आर्यलंड, फ्रान्स) या जीम जारमुश दिग्दर्शीत चित्रपटाने होणार आहे . जागतिक चित्रपट स्पर्धात्मक विभागात १०३ देशांमधील ९०० हून अधिक चित्रपट आले होते. त्यातील १४ चित्रपटांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय ज्युरींमार्फत चित्रपटांचे परीक्षण केले जाणार असून, सर्वोत्कृष्ट आंतराष्ट्रीय चित्रपटास १० लाख रुपयांचा महाराष्ट्र शासन संत तुकाराम सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार दिला जाणार आहे. स्पर्धेसाठी निवडलेले चित्रपट १ – अ सॅड ॲण्ड ब्युटिफुल वर्ल्ड – दिग्दर्शक- सिरील अरीस २ – ऍडमस सेक – – दिग्दर्शक – लॉरा वान्डेल ३ – ऑल दॅटस् लेफ्ट ऑफ यू – दिग्दर्शक – शिरेन दाबीस ४ -ॲज वुई ब्रेथ – दिग्दर्शक – सेयहमस अलतून ५ – ब्ल्यू हॅरॉन दिग्दर्शक – सोफी रोमवारी ६ – लॉस्ट लँड दिग्दर्शक – अकीओ फुजीमोटो ७ – मिल्क टीथ – दिग्दर्शक- मिहाय मिनकान ८ – निनो – दिग्दर्शक – पाऊलीन लोकस ९ – रीबिल्डिंग – दिग्दर्शक – मॅक्स वॉकर-सिल्व्हरमॅन १० – सायलेंट फ्रेंड – दिग्दर्शक – लडीको एन्येडी ११ – स्पाईंग स्टार्स – दिग्दर्शक – विमुक्थी जयसुंदरा १२ – द एलिसियन फील्ड – दिग्दर्शक – प्रदीप कुब्राह १३ – धिस इज माय नाईट – दिग्दर्शक – जाफरा युनूस १४ – व्हाइट स्नेल – दिग्दर्शक – एल्सा क्रेमसर, लेवीन पिटर