आळा घालण्यासाठी सर्व दिवस २४ तास नियंत्रण कक्ष पुणे – महापालिका निवडणुकीत पैशांच्या वापरावर इन्कमटॅक्स (प्राप्तीकर विभाग) विभाग वाॅच ठेवणार असून, वारेमाप खर्चावर आळा घालण्यासाठी सर्व दिवस २४ तास नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षात नागरिकांनी माहिती कळवावी यासाठी टोल फ्री क्रमांक देण्यात आला आहे. तसेच व्हाॅट्स अॅप, एसएमएस किंवा इमेलद्वारेही नागरिक माहिती देऊ शकतात, असे विभागातर्फे कळवण्यात आले आहे. राज्यातील महानगरपालिका निवडणुका, २०२५-२६ दरम्यान पैशांच्या गैरवापराला आळा घालण्यासाठी इन्कमटॅक्स विभाग कटिबद्ध आहे. मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका सुनिश्चित करण्याच्या आणि निवडणुकीची शुचिता राखण्याच्या उद्देशाने, प्राप्तिकर विभाग पुणेद्वारे सर्व दिवस चोवीस तास नियंत्रण कक्षाचा समावेश असलेली निवडणूक देखरेख यंत्रणा स्थापन करण्यात आली आहे ठाणे, उल्हासनगर, कल्याण डोंबिवली, भिवंडी निजामपूर, मीरा-भाईंदर, वसई विरार, पनवेल, अहिल्यानगर, पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली-मिरज-कुपवाड हे विभाग पुणे विभागात येतात. आचारसंहिता लागू असेपर्यंत ही यंत्रणा कार्यरत राहील. निवडणूक प्रचारासाठी रोख रकमा आणि मौल्यवान वस्तूंचा गैरवापर होत असल्यास, त्याबाबत माहिती देण्यासाठी नागरिकांना सक्षम करणे हा यामागील उद्देश आहे. असे आहेत संपर्क क्रमांक टोल फ्री क्रमांक – १८००-२३३-०७०१ व्हॉट्सॲप क्रमांक – ९९२२३८०८०६ ईमेल आयडी – pune.pdit.inv@incometax.gov.in पत्ता – नियंत्रण कक्ष, कक्ष क्र. ८२९, ८ वा मजला, आयकर सदन, बोधी टॉवर, सॅलिसबरी पार्क, गुलटेकडी, पुणे ४११०३७