Pune : शिक्षक चाचणी मे- जूनमध्ये होणार
Updated On:

पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीसाठी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (टेट) मे – जून २०२५ मध्ये होणार आहे.
पात्र उमेदवारांनी परीक्षेबाबत आवश्यक पूर्वतयारी करावी. परीक्षेबाबतची अधिसूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर यथावकाश प्रसिद्ध केल्यानंतर उमेदवारांनी संकेतस्थळावर भेट द्यावी, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त अनुराधा ओक यांनी स्पष्ट केले आहे.




