Pune : वारजे व माळवाडी, वडगाव बुद्रुकमध्ये तापकीर यांचे उत्स्फूर्त स्वागत

धनकवडी – खडकवासला मतदारसंघात महायुतीचे उमेदवार भीमराव तापकीर यांनी विकासाच्या कामांमुळे स्वत:चा वेगळा ठसा उमटवला आहे. त्यामुळे वडगाव बुद्रुक, सिंहगड रोड, वारजे, माळवाडी आणि इतर भागांमध्ये तापकीर यांच्या प्रचार दरम्यान नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
तापकीर म्हणजे विकास, अशा घोषणा या सभांमध्ये ऐकायला मिळत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली परिसराचा झालेला कायापालट नागरिकांच्या मनावर ठसला आहे. खडकवासला मतदारसंघात भीमराव तापकीर यांचा वेगाने प्रचार सुरू आहे. सलग तीन कार्यकाळ यशस्वीरीत्या पार पाडल्यानंतर, निवडणुकीला सामोरे जात असताना तापकीर यांना नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे.
ग्रामीण आणि शहरी भागांचा संगम असलेल्या या मतदार संघात नागरिकांकडून त्यांचे उत्स्फूर्त स्वागत होत आहे. नागरिकांशी प्रामाणिक आणि साधे वर्तन हे त्यांचे तापकीर यांचे स्वभाव वैशिष्ट्य आहे, ज्यामुळे लोकांमध्ये त्यांच्या विषयी आपुलकीची भावना आहे. मागील तीन कार्यकाळांमध्ये त्यांनी विधानसभेत खडकवासला मतदारसंघाच्या प्रश्नांवर प्रभावी आवाज उठवला. यामध्ये मिळकतकराचा प्रश्न, पाणीपुरवठा, रस्ते सुधारणा आणि नागरी सुविधा यासारखे प्रश्न सुटले.
गेल्या पाच वर्षांत आमदार तापकीर यांनी मतदारसंघात अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवले आहेत याच कारणातून तापकीर विजयी होतील, असा विश्वास महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत. त्यांच्या प्रचारासाठी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, आणि स्थानिक नेते प्रचंड जोमाने काम करीत आहेत.




