Pune : इस्राईलचे शोषानी यांना सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्कार

पुणे : इस्राईल आणि भारत यांच्यातील परस्पर संबंध अधिक सक्षम होण्यात, परराष्ट्र क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल इस्राईलचे भारतातील कॉन्सुल जनरल कोब्बी शोषानी यांना सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या वतीने सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्कार २०२५ प्रदान करण्यात आला.
पुण्यात आयोजित एका सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेते रझा मुराद व सूर्यदत्तचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय चोरडिया यांच्या हस्ते शोषानी यांचा सन्मान करण्यात आला. या वेळी संस्थेच्या उपाध्यक्ष सुषमा चोरडिया, सहयोगी उपाध्यक्षा स्नेहल नवलखा, कार्यकारी विकास अधिकारी सिद्धांत चोरडिया, मुख्य कार्यपालन अधिकारी अक्षित कुशल, महाव्यवस्थापक रोहित संचेती, वर्ल्ड ट्रेड सेंटरचे व्यवस्थापकीय संचालक सागर चोरडिया आदी उपस्थित होते.
डॉ. संजय चोरडिया म्हणाले, कोब्बी शोषानी यांनी परराष्ट्र क्षेत्रात दिलेले योगदान अतुलनीय आहे. त्यांच्या धोरणी आणि मुत्सद्दी कार्यामुळे भारत आणि इस्राईल या दोन्ही देशांतील परस्पर सबंध अधिक मजबूत होत आहेत. कोब्बी शोषानी म्हणाले, काटेकोर शिस्त आणि समर्पित वृत्ती ही इस्राईलची ओळख असून, त्या देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मला मिळतेय, याचा मला अभिमान वाटतो.
मला भारताविषयी अतीव प्रेम आहे. वर्षागणिक या सुंदर अशा देशाची संस्कृती आणि येथील लोकांविषयी माझ्या मनात आदर, प्रेम व आस्था वाढत आहे. विद्यार्थ्यांना प्रगतीच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी सूर्यदत्त मोलाचे योगदान देत आहे.




