Pune : प्राध्यापक भरतीच्या दिशेने पाऊल

पुणे : उच्च शिक्षण संचालनालयाने अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील विद्यार्थी संख्येवर आधारीत रिक्त पदांची माहिती मागवली आहे. त्यावरुन राज्यातील महाविद्यालयातील किती प्राध्यापकांची पदे रिक्त राहणार आहेत, त्याची माहिती प्राप्त होणार आहे. ही मागवित उच्च शिक्षण विभागाने प्राध्यापक भरतीच्या दिशेने पाऊल उचलले आहे.
यासंदर्भात उच्च शिक्षण संचालनालयाने सर्व महाविद्यालांना परिपत्रक पाठविले आहे. दि. १ ऑक्टोबर २०१७ रोजी असणाऱ्या स्थितीच्या विद्यार्थी संख्येवर मंजूर असणाऱ्या पदांनुसार ३१ डिसेंबर २०२४ रोजी अखेर भरलेल्या व रिक्त पदांची स्थित सादर करण्यात यावी, असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, प्राध्यापकांची पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. ही पदे राज्य लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) भरण्याचे राज्य सरकारच्या विचाराधीन होते. मात्र, ‘एमपीएससी’तर्फे भरती केल्यास या प्रक्रियेला विलंब होण्याची शक्यता असल्याने आता ही पदे विद्यापीठ स्तरावरच भरण्यात येतील, असे संकेत नुकतेच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले होते. त्यामुळे आता लवकरच प्राध्यापक भरतीला सुरुवात होईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




