PUNE: सवाईसाठी पीएमपीकडून विशेष बस
Updated On:

पुणे – सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवासाठी पीएमपीकडून दि. १३ ते १७ जानेवारीदरम्यान मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळ क्रीडा संकुल येथून विशेष बस सोडण्यात येणार आहे.
सवाई गंधर्व संगीत महोत्सवाच्या श्रोत्यांसाठी कार्यक्रम संपल्यानंतर परतीच्या सोयीसाठी पीएमपीकडून २५ टक्के जादा तिकीट दर आकारला जाणार आहे. दि. १३ ते १५ आणि १७ डिसेंबर रोजी रात्री साडेदहा वाजता मुकुंदनगर येथून बस सुटतील. तर, १६ डिसेंबर रोजी रात्री साडेबारा वाजता मुकुंदनगर येथून बस सुटणार आहेत.
मार्गाचे नाव मार्गे
- मुकुंदनगर ते निगडी भक्ती शक्ती : दांडेकर पूल, डेक्कन, वाकडेवाडी, कासारवाडी, पिंपरी, चिंचवड स्टेशन
- मुकुंदनगर ते धायरी मारूती मंदिर : दांडेकर पूल, विठ्ठलवाडी, आनंदनगर, वडगांव फाटा, धायरी गांव
- मुकुंदनगर ते कोथरूड डेपो : टिळक रस्ता, डेक्कन कॉर्नर, पौड फाटा, जयभवानीनगर, वनाज कंपनी
- मुकुंदनगर ते वारजे माळवाडी : डेक्कन कॉर्नर, पौड फाटा, कोथरूड स्टॅण्ड, गांधी भवन, कर्वेनगर





