पुणे : शहरासह जिल्ह्यात चाळीशीपार असलेल्या कमाल तापमान गेल्या २४ तासात एक अंशाने घट झाली आहे. त्यामुळे कोरेगांव पार्क येथी ४०.५ अंशावरील कमाल तापमान रविवारी (दि. १६) ३९.७ अंशापर्यंत खाली आले. तर बहुतांश भागातील कमाल तापमान ३९ अंशाच्या पुढे नोंदविले.
कमाल तापमानात घट झाली असली तरी, उन्हाचा चटका चांगलाच जाणवत आहे. विशेषत: कोरेगांव पार्क, वडगांवशेरी, मगरपट्टा, शिवाजीनगर या परिसरात सकाळी ११ ते दुपारी तीन दरम्यान उन्हाचा चटका अंगाची लाहीलाही करत आहे.
त्यामुळे सुट्टीचा दिवशीही बाजारपेठा आणि प्रमुख रस्त्यावर नागरिकांची वर्दळ कमी होती. पहाटे किमान तापमान १८ अंशावर जाऊन पोहचले आहे. पुढील दोन दिवस शहरासह जिल्ह्यात हवामान कोरडे राहील. दुपारनंतर आकाश ढगाळ राहणार असून, कमाल व किमान तापमानात फारसा बदल होणार नसल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.
प्रमुख भागातील कमाल तापमान
कोरेगांव पार्क ३९.७, तळेगांव ढमढेरे ३९.३, पुरंदर ३९.२, चिंचवडग, हडपसर आणि मगरपट्टा ३९, वडगांवशेरी ३८.५, शिवाजीनगर ३८.२, एनडीए आणि इंदापूर ३८, पाषाण ३७.८, बारामती ३७.२, हवेली ३७.१, दौंड ३६.९.