Pune: पर्वतीत एक तरी नवे काम दाखवा: डॉ. कोल्हे

बिबवेवाडी – महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यातील सर्व आश्वासन पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहे. आरोग्य विमापासून लाडकी बहीण योजना मोठी वाढ देण्यासाठी बदल घडवा. गेली १५ वर्ष विद्यमान आमदारांची एक हाती सत्ता असताना एक तरी नवे काम पर्वती मतदारसंघात दाखवा.
जनता वसाहत मधील सर्व स्थानिक मंडळी आणि पर्वतीकर मायबाप जनता सोबत असल्याने आपल्या पर्वतीच्या कन्येला विधानसभेत पाठवायचे आहे. महिला आमदार असून 15 वर्षांत एकही महिलांच्या सबलीकरणासाठी काम नाही, असे संसदरत्न खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी सांगितले.
पर्वती विधानसभा मतदार संघ महाविकास आघाडी व इंडिया फ्रंटच्या उमेदवार अश्विनी कदम यांच्या प्रचारार्थ बाईक रॅलीची सुरूवात व्हीआयटी हॉस्टेल चौक पासून होऊन भव्य सभा राम मंदिर चौक जनता वसाहत याठिकाणी झाली. यावेळी डॉ. कोल्हे बोलत होते. छावा स्वराज्य सामाजिक संस्था, आरपीआय (आंबेडकर), महाराष्ट्र बँड कलाकार उत्कर्ष संघटना तसेच अपक्ष उमेदवार रविंद्र क्षीरसागर यांनी मताचे विभाजन होऊन दुर्वीकरण होऊ नये यासाठी जाहीर पाठिंबा जाहीर केला.
यावेळी माजी नगरसेवक अशोक हरनावळ, राहुल तूपेरे, सतीश पावर, सौरभ माने, सचिन जोगदंड, निलेश पवार, सुरज लोखंडे, प्रदीप शिवशरण, संतोष पिसाळ, मोहन पासलकर. प्रविण चव्हाण, सुभाष झेंडे, प्रविण चव्हाण, सुनिल शिंदे,समिर पवार, रोहित माळी, संदीप काळे, गणेश काळे, अमोल कानडे, आयाज शेख, मंगेश तावरे, सिद्दी पवार,अल्पना मोरे, वैशाली दारवटकर आदी उपस्थित होते.





