पुणे – शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघासाठी निवडणुकीची प्रक्रिया मंगळवारपासून सुरू झालेली आहे. पहिल्या दिवशी शिरूर मतदारसंघातून 20 इच्छुकांनी 38 अर्ज घेतले असल्याची माहिती शिरूर मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी रमेश काळे यांनी दिली.
मावळ आणि शिरूर मतदारसंघांसाठी दि. 29 एप्रिलला मतदान होणार आहे. शिरूर मतदारसंघातून शिवसेना युतीतर्फे शिवाजीराव आढळराव-पाटील तर राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे अमोल कोल्हे यांनी अर्ज घेतला आहे. 9 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मूदत आहे. शिरूर मतदारसंघासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करावे लागणार आहेत.