Pune : न्यायालयाच्या आवारात स्वत:वरच वार
Updated On:

पुणे : शिवाजीनगर न्यायालयाच्या आवारात चारच्या सुमारास एका तरुणाने काचेची बाटली फोडून गळ्यावर वार करुन घेतले. त्याला तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
शिवाजीनगर पोलिसांनी सांगितले की, मोबीन सिंग नावाच्या व्यक्तीने गेट नंबर एकच्या पलिकडे रस्त्यावर पडलेली मोकळी काचेची बाटली फोडून स्वत:चा गळा चिरुन घेतला.
नागरिकांनी आणि उपस्थित पोलिसांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. त्याची भाषा पोलिसांना कळत नसल्याने कारण कळू शकले नाही.




