पुणे – विधानसभा निवडणुकीत शिवाजीनगर मतदारसंघातून पराभूत झालेले काँग्रेसचे उमेदवार दत्ता बहिरट यांनी भाजपचे विजयी उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेली निवडणूक याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. न्यायमूर्ती संदीप मारणे यांनी हा निकाल दिला. यामध्ये शिरोळे यांच्यावतीने ॲड. अनुराग मिश्रा आणि ॲड. रोहन नहार यांनी बाजू मांडली. मतदार यादीत छेडछाड झाल्याचा, मतदारसंख्येत संशयास्पद चढउतार झाल्याचा आणि निवडणूक प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप करत बहिरट यांनी निवडणूक रद्द करण्याची मागणी केली होती. या दाव्यात निवडणूक आयोगासह इतरांना पक्षकार करण्यात आले होते. याचिका आवश्यक तपशीलाशिवाय दिली असून निवडणूक रद्द करण्याच्या कारवाईचे कारण मांडलेले नाही. यामुळे याचिका फेटाळण्यास पात्र असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.