Pune : खराडीत मसाज पार्लवर छापा; व्यवस्थापकासह पाच तरुणी ताब्यात

पुणे : खराडीत मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत नागालँड, पश्चिम बंगाल, राजस्थानसह तरुणींसह पाच जणींना ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी मसाज पार्लरच्या मालकासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी मसाज पार्लरचा मालक कफील उद्दीन (३०, रा. जमनामुख, आसाम) याच्यासह व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खराडीतील एका इमारतीत असलेल्या सेलेस्टिया द वेलनेस स्पा येथे वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून खातरजमा केली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तेथे छापा टाकला.
मसाज पार्लरमधील तरुणींना पैशांचे आमिष दाखवून त्यांना वेश्याव्यवसायास प्रवृत्त केले जात असल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी पाच तरुणींना ताब्यात घेतले. मसाज पार्लरमधील व्यवस्थापकाला ताब्यात घेण्यात आले असून, तो अल्पवयीन असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
खराडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक माेनाली भदे, नवनाथ वाळके, सुरेंद्र साबळे, अमोल भिसे, महेश नाणेकर, वैशाली खेडेकर, पूजा डाहाळे, कोमल वाकचौरे यांनी ही कारवाई केली.




