Pune : पुणे-अहमदाबाद विमानांना उशीर
Updated On:

पुणे : अहमदाबाद-लंडन विमान अपघातामुळे अहमदाबाद विमानतळ काही वेळासाठी बंद करण्यात आले होते. त्यामुळे पुण्यातून अहमदाबादला जाणाऱ्या दोन विमानांना फटका बसला. एका विमानाच्या उड्डाणाला पाच तास उशीर झाला. तर, दुसऱ्या विमानाला एक तास उशीर झाला.
इंडिगो कंपनीचे विमान दुपारी तीन वाजून ५० मिनिटांनी अहमदाबादसाठी उड्डाण करणार होते. मात्र, अपघाताच्या घटनेमुळे या विमानाला उशीर झाला. हे विमान रात्री नऊ वाजता पाच तास उशिराने उड्डाण केले.
तर, अक्सा एअर कंपनीचे विमान पुण्यातून सायंकाळी पाच वाजून ५५ मिनिटांनी अहमदाबादसाठी उड्डाण करणार होते. मात्र, ते विमान रात्री पावणे सात वाजता सुटले. त्यामध्ये अहमदाबादला जाणाऱ्या प्रवाशांना फटका बसला.





