पुणे : महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा अधिनियम २०२४ हा कायदा महाराष्ट्र विधानसभा व विधान परिषदेमध्ये पास करण्यात येऊ नये, यासाठी ॲडव्होकेट सोशल फोरम, तसेच पुणे शहरातील इतर आंबेडकरी पक्ष संघटना यांच्या वतीने मा. जिल्हाधिकारी पुणे यांना हरकतीचे निवेदन देऊन या कायद्याच्या विरोधात निषेध व्यक्त करण्यात आला. याप्रसंगी ॲड. जितेंद्र कांबळे म्हणाले, हा कायदा नागरिक व पत्रकार, तसेच सामाजिक कार्यकर्त्यांच्या संविधानिक मूलभूत अधिकारावर गदा आणणारा असून, हा कायदा म्हणजे लोकशाही संपवण्याचा फडणवीस सरकारचा छुपा अजेंडाच आहे. यामुळे लोकशाहीची हुकूमशाहीच्या दिशेने वाटचाल होईल. त्यामुळे हा कायदा पास करण्यात येऊ नये. याप्रसंगी ॲड. तौशिफ शेख, मा. प्रभाकर सरोदे , शकुंतलाताई शेलार, इत्यादींनी आपले विचार व्यक्त केले. या वेळी ॲड. अश्विनी कांबळे, ॲड. राजेंद्र गायकवाड, ॲड. रोहित सोनवणे, अरविंद कांबळे, ॲड. प्रमोद डोळस, मा. उमेद कांबळे, ॲड. नागीन कांबळे, ॲड. कोमल जावीरसह अनेक वकील व सामाजिक कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते.