लालबागच्या राजाला भरभरुन दान; जमा होणार तब्बल ८ कोटींचे दान?

मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला भक्तांनी भरभरून दान द साडेसहा कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची देणगी प्राप्त झाली आहे. आता गुरुवारी नेमकी किती देणगी मिळाली, हे विसर्जनानंतर मोजले जाणार आहे. मंगळवारपर्यंत लालबागचा राजा मंडळाला 5.1 कोटी रुपयांची देणगी मिळालेली होती. बुधवारी यात दीड कोटी पेक्षाही जास्तीची भर पडली.
एका इंग्रजी वर्तमानतपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, मंडळाचे पदाधिकारी मंगेश दळवी यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली. मंगेश दळवी यांनी म्हटलयं की, रोख देणगीमध्ये वाढ झाली आहे. तब्बल 4.04 कोटी रुपयांची रोख रक्कम देणगीच्या स्वरुपात बुधवारपर्यंत प्राप्त झाली आहे.
मंगळवारी देणगीची हीच आकडेवारी 3.35 कोटी रुपयांपर्यंत होती. दरम्यान, आतापर्यंत 2.44 कोटी रुपये किंमतीचे 4.64 किलो सोनं आणि 25.41 लाख रुपये किंमतीचे 46.2 किलो चांदीची देणगीही मिळाल्याचं मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.





