Pune : पुण्यात प्रभात रोड उच्चभ्रू

पुणे : राज्यासह शहरात मागील दोन वर्षांत रेडी रेकनरमध्ये वाढ झाली नव्हती. यावर्षी 2025-26 या आर्थिक वर्षात रेडी रेकनरमध्ये वाढ करण्यात आली असून त्याची अंमलबजावणी मंगळवारपासून होत आहे. नोंदणी व मुद्रांक विभागाने पुणे शहरात रेडी रेकनरच्या दरात सरासरी 4.16 टक्के इतकी वाढ केली आहे.
त्यानुसार शहरात घर घेण्याच्या दृष्टीने प्रभात रोड-लॉ कॉलेज रस्ता परिसर सर्वाधिक महागडा ठरला आहे. या परिसरात सदनिकेचा दर प्रति चौरस मीटर 1 लाख 80 हजार 950 रुपये इतका आहे. तर आॉफिससाठीचा दर 2 लाख 8 हजार 100 रुपये प्रति चौरस मीटर इतका आहे.
तर, दुसऱ्या क्रमांकावर कोरेगाव पार्क परिसर असून या परिसरात सदनिकांचा दर 1 लाख 79 हजार 490 रुपये प्रति चौरस मीटर तर आॉफिससाठीचा दर हा 2 लाख 6 हजार 420 रुपये प्रति चौरस मीटर इतका आहे. मागील काही वर्षांची आकडेवारी पाहता शहरात घरे घेण्यासाठीचा सर्वाधिक महागडा परिसर म्हणून कोरेगाव पार्क ओळखला जात होता तर दुसऱ्या क्र्मांकावर प्रभात रोड परिसर होता परंतु, यावर्षी मात्र प्रभात रोड उच्चभ्रू ठरला असून कोरेगाव पार्कची दुसऱ्या क्रमांकावर घसरण झाली आहे.
दुकान, जमीनीसाठी अव्वल….
शहरात दुकानांसाठीचा सर्वाधिक महागडा परिसर जंगली महाराज रस्ता असून या परिसरात दुकानांचा दर 4 लाख 75 हजार 940 रुपये प्रति चौरस मीटर असा आहे. शहरात जमिनीचा सर्वाधिक कमी दर हा नांदोशी गावात असून या ठिकाणी 2 हजार 170 रुपये प्रति चौरस मीटर इतका आहे. त्याखोलाखाल किरकिटवाडी येथे 2 हजार 680 रुपये प्रति चौरस मीटर इतका आहे.
प्रमुख १० भागातील मालमत्त्तांचे दर (प्रति चौ. मी.)
भागाचे नाव – जमिनीचा दर – सदनिकेचा दर – आॉफिसचा दर – दुकानांचा दर
प्रभात रोड, भांडारकर रोड, लॉ कॉलेज रोड – 86,710 रुपये – 1,65,220 रुपये – 1,90,010 रुपये – 2,19,820 रुपये
गरवारे काॉलेज ते एसएनडीटी काॉलेज रोड – 81,520 रुपये – 1,51,870 रुपये – 1,74,660 रुपये – 3,47,970 रुपये
ज्ञानेश्वर पादुका चौक ते गणेशकखिंड रस्ता – 77,950 रुपये – 1,35,770 रुपये – 1,56,140 रुपये – 2,10,960 रुपये
गोखले चौक ते बाजीराव रोड लक्ष्मी रोड – 77,220 रुपये – 1,14,720 रुपये – 1,85,440 रुपये – 2,98,260 रुपये
लॉ कॉलेज, टीपी स्कीम नंबर एक – 77,000 रुपये – 1,30,160 रुपये – 1,52,220 रुपये – 2,27,040 रुपये
भांडारकर रोड टीपी स्कीम नंबर एक – 76,630 रुपये – 1,40,490 रुपये – 1,61,570 रुपये – 2,27,040 रुपये
के. पालकर पथ प्रभात रोड गल्ली क्र्मांक सात – 75,170 रुपये – 1,55,670 रुपये – 1,79,030 रुपये- 2,19,820 रुपये
लकडी पूल ते गोखले चौक लक्ष्मी रोड – 73,250 रुपये – 1,24,170 रुपये – 1,62,940 रुपये – 2,83,990 रुपये
घोले रोड टीपी स्कीम एक – 73,010 रुपये – 1,22,660 रुपये – 1,44,080 रुपये – 1,82,330 रुपये
आपटे रोड टीपी स्कीम नंबर एक – 72,980 रुपये – 1,17,030 रुपये – 1,45,790 रुपये – 1,82,330 रुपये





