पुणे –अल्पवयीन असताना तरुणीबरोबर शारिरीक संबंध प्रस्थापीत केले. त्याचे व्हिडिओ चित्रीकरण केले. मात्र, तरुणीने लग्नास नकार दिला म्हणून ते चित्रीकरण तिच्या वस्तीतील मुलांना पाठवले. याप्रकरणी बदनामी करणाऱ्या तरुणाविरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, त्याला अटक केली आहे.
निलेश सुभाष शेंडगे (वय 25, रा. लोहियानगर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत एका 19 वर्षीय तरुणीने येरवडा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही घटना ऑक्टोबर 2018 ते 30 ऑगस्ट 2021 दरम्यान घडली. फिर्यादी तरुणी अल्पवयीन असताना आरोपी निलेश शेंडगे याने तिच्याबरोबर प्रेमसंबंध प्रस्थापित केले. तिच्या इच्छेविरुद्ध मित्रांच्या रुमवर व इतर ठिकाणी नेऊन तिच्याशी शारिरीक संबंध निर्माण केले. त्याचे व्हिडिओ बनविले. या संबंधातून ती गर्भवती राहिल्यावर त्याने बहिणीच्या मदतीने तिचा गर्भपात केला.
दरम्यान, फिर्यादी तरुणीने लग्नास नकार दिल्याच्या कारणातून आरोपीने फिर्यादी राहात असलेल्या वस्तीमधील मुलांना तिचा व्हिडिओ पाठवून तिची बदनामी केली.