बाणेर – प्रभाग क्र. ९ मधून कपबशी चिन्हावर अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत असलेल्या पूनम विशाल विधाते यांच्या पाठीशी महिलांची मोठी आणि संघटित ताकद उभी असल्याचा दावा केला जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून वामा वुमन्स क्लबच्या माध्यमातून पूनम विधाते यांनी महिलांसाठी विविध सामाजिक, आरोग्यविषयक, शैक्षणिक व सक्षमीकरणाचे उपक्रम राबवले आहेत. या सातत्यपूर्ण कार्यामुळे परिसरातील महिलांमध्ये त्यांच्याविषयी विश्वास आणि आपुलकी असून आहे. महिलांच्या आरोग्य व फिटनेससाठी पूनम विधाते यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या महिला मॅरेथॉन स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला होता. या स्पर्धेत सहभागी झालेल्या अनेक महिला पूनम विधाते यांच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेत असून, त्या त्यांच्या विजयासाठी खंबीरपणे उभ्या आहेत. पूनम विधाते यांनी केवळ निवडणुकीच्या काळातच नव्हे, तर सातत्याने महिलांसाठी काम केले आहे. त्यामुळे त्या आमच्या लाडक्या बहिणी आहेत, अशी भावना प्रभागातील महिलांनी व्यक्त केली. महिलांचा हा उत्स्फूर्त पाठिंबा पाहता, लाडक्या बहिणींच्या ताकदीवर पूनम विधाते या प्रचंड मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास महिला वर्गातून व्यक्त होत आहे. प्रभाग क्र. ९ मधील निवडणूक लढत दिवसेंदिवस रंगतदार होत असताना, महिलांचा हा संघटित पाठिंबा पूनम विधाते यांच्यासाठी निर्णायक ठरण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.