Pune : पोलीस उपनिरीक्षक पदांचा निकाल जाहीर

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट- ब मुख्य परीक्षा २०२२ या परीक्षेतील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या ५९८ पदांचा अंतिम निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला. या परीक्षेत सातारा जिल्ह्यातून अमोल घुटुकडे हे राज्यात, तसेच मागासवर्गातून प्रथम आले आहेत.महिलांमधून अनिशा आगरकर प्रथम आल्या आहेत. निकालाची माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या ६०३ पदांपैकी ५ पदांचा निकाल राखून ठेवून उर्वरित ५९८ पदांचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला. पात्र ठरलेल्या उमेदवारांनी अर्जात खोटी अथवा चुकीची माहिती दिल्याचे आढळल्यास किंवा आवश्यक प्रमाणपत्रांची पूर्तता नियुक्तीवेळी न केल्यास त्यांची उमेदवारी रद्द करण्यात येईल.
अंतिम निकालात पात्र न ठरलेल्या उमेदवारांना जर गुणांची पडताळणी करायची असेल, तर त्यांनी १० दिवसांत आयोगाकडे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे, अशी माहिती आयोगाने दिली आहे.




