Pune : पोलीस कर्मचाऱ्याची गळफास घेत आत्महत्या
Updated On:

पुणे : शिवाजीनगर पोलीस वसाहतीत एका पोलीस कर्मचाऱ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केला असून याचे कारण समजू शकले नाही.
सचिन हरिश्चंद्र सुर्वे ( ४६) असे आत्महत्या केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. सुर्वे खडक पोलीस ठाण्यात नियुक्तीस होते. ते वसाहतीतील शिवनेरी बिल्डींगमध्ये राहत होते. त्यांची पत्नी, मुलगा माहेरी गेले होते.
शुक्रवारी दुपारी सुर्वे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद झाली आहे.




