Pune Police – पोलीस ठाण्यातील आधिकारी व कर्मचारी मिळून एकुण 32 जणांच्या बदलीचा आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी काढला असून त्यामुळे लोणी काळभोर पोलीस ठाण्यात खळबळ उडाली आहे. एकदम एवढ्या मोठ्या प्रमाणात आधिकारी व कर्मचार्यांच्या बदल्या झाल्यामुळे आगामी काळात लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या कारभाराची घडी विस्कळीत होणार आहे. प्रशासकीय कारणास्तव एकाच वेळी तब्बल 32 आधिकारी व कर्मचार्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. हे आदेश पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी बुधवारी (दि. 18) रात्री उशिरा परिपत्रकाद्वारे जारी केले. एकाच पोलीस ठाण्यातील एवढ्या मोठ्या संख्येने कर्मचार्यांच्या बदल्या झाल्याने पुणे शहर पोलीस दलात जोरदार चर्चा रंगली आहे. या निर्णयामागील नेमके कारण काय ? अचानक एवढ्या मोठ्या प्रमाणावर बदल्या का केल्या ? याबाबत तर्क-वितर्काना उधाण आले आहे. पुणे शहर पोलीस आयुक्तांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 मधील कलम 22 (एन) अन्वये हे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार 3 सहायक फौजदार, 10 पोलीस हवालदार, 19 पोलीस अंमलदार यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यातील एक कर्मचारी इंद्रजीत डाडर यांची वैद्यकीय व कौटुंबिक अडचणीमुळे विनंतीनुसार बदली करण्यात आली आहे. संबंधित कर्मचार्यांच्या तत्काळ कार्यमुक्तीचे आदेश वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना देण्यात आले असून संबंधित कर्मचार्यांना तत्काळ कार्यमुक्त करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. लोणी काळभोर पोलीस ठाणे. बदली झालेल्या कर्मचार्यांनी नव्या ठिकाणी हजर झाल्याचा अनुपालन अहवाल कार्यालयात सादर करणे बंधनकारक असल्याचेही आदेशात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे. दरम्यान बहुसंख्य कर्मचार्यांची बदली लोहगाव, विमानतळ, चंदननगर आणि सिंहगड रोड पोलीस ठाण्यांकडे करण्यात आली आहे. विशेष म्हणजे लोहगाव व विमानतळ पोलीस ठाण्यांकडे मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ हलविण्यात आले आहे. एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात बदली आदेश निघाल्याने पोलिस दलात उलटसुलट चर्चा सुरू आहे. काहीजण याकडे नियमित प्रशासकीय प्रक्रिया म्हणून पाहत असले, तरी काहींमध्ये या निर्णयामागील कारणांबाबत उत्सुकता आणि संभ्रम व्यक्त केला जात आहे. या मोठ्या फेरबदलामुळे लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या कामकाजावर काय परिणाम होणार, तसेच नव्या मनुष्यबळासह संबंधित ठाण्यांची कार्यपद्धती कशी बदलणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. यांची बदली नाव (बदलीचे ठिकाण) सहायक फौजदार- संतोष सुखदेव घावटे (लोहगाव), विनोद ज्ञानेश्वर कांबळे (विमानतळ), रामदास शंकर मेमाणे (चंदननगर). पोलीस हवालदार- विजय नथु जाधव, अश्विनी जयसिंग माळी, दिपाली दौलत पाडुळे, गणेश विलास सातपुते (चौघे लोहगाव), दादा भिमराव हजारे, सुनिल मदन नागलोत, तेज दिपक भोसले (तिघे विमानतळ), प्रदीप भीमराव क्षीरसागर, संभाजी सुभाष दिवेकर, दिगंबर रामदास जगताप (तिघे चंदननगर). पोलीस अंमलदार- अजिंक्य दिपक जोजारे, शैलेश चांगदेव कुदळे, वैशाली महीपती निकंबे, बाजीराव चंदर वीर, अमोल विष्णु मुंडे, चक्रधर जयद्रथ शिरगिरे, राहुल सुरेंद्र माळगे, ईश्वर हरीदास भगत (सर्व लोहगाव). प्रशांत प्रकाश सुतार, अक्षय राजेंद्र कटके, बालाजी संदीपान बांगर, संदिप किशन धुमाळ, प्रवीण नामदेव सपकाळ, मल्हारी शिवाजी ढमढेरे, दीपक सुनिल सोनवणे, कोमल सोमेश्वर आखाडे (सर्व विमानतळ). किशोर पांडुरंग कुलकर्णी, वसंत भानुदास चव्हाण, घनश्याम कुमार आडके (तिघे सिंहगड रोड).