Pune : पापलेट, रावस तेजीत ; मटण, चिकन आणि अंडी स्थिर

पुणे : गणेश पेठ येथील घाऊक मासळी बाजारात देशाच्या पूर्व व पश्चिम किनारपट्टीहून रविवारी (दि.२) मासळीची आवक नेहमीच्या तुलनेत कमी झाली. बाजारात पापलेट, रावस, बांगडा, कोळंबी, बोंबीलला मागणी वाढली आहे.
मागणी वाढल्याने पापलेट, रावसचे भाव तेजीत असून बांगडा, कोळंबी, बोंबीलचे भाव स्थिर आहेत. इतर सर्व प्रकारच्या मासळीचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहेत. मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे मटण, चिकन, इंग्लिश अंडी आणि गावरान अंडीचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहेत.
गणेश पेठेतील मासळी बाजारात रविवारी (दि.२) खोल समुद्रातील मासळी १० ते १५ टन, खाडीच्या मासळीची ४०० ते ५०० किलो आणि नदीच्या मासळीची १००० ते १२०० किलो इतकी आवक झाली. आंध्र प्रदेश येथून राहू, कतला आणि सिलनची सुमारे १५ ते २० टन इतकी आवक झाली, अशी माहिती मासळीचे व्यापारी ठाकूर परदेशी, चिकन-अंड्याचे व्यापारी रूपेश परदेशी आणि मटणाचे विक्रेते संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर कांबळे यांनी दिली.
खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे भाव) : पापलेट : कापरी : १८००-२०००, मोठे : १५००-१६००, मध्यम : १२००-१४००, लहान : १०००-११००, भिला : ७००-८००, हलवा : ६००-७००, सुरमई : ४००-७५०, रावस : लहान ७००-८००, मोठा ९००-१०००, घोळ : ८००-९००, करली : ३००-४००, करंदी (सोललेली) : ४४०, भिंग : ३६०-४००, पाला : ८००-१६००. वाम : पिवळी १०००-१२००, काळी : ५००-६००, ओले बोंबील : २५०-३५०. कोळंबी : लहान : १८०-२४०, मोठी : ७००-८००, जम्बो प्रॉन्स : १४००-१५००, किंग प्रॉन्स : ८००-९००, लॉबस्टर : २०००-२२००, मोरी : २५०-४००, मांदेली : १२०-१८०, राणीमासा : २००-२४०, खेकडे : ३२०-४००, चिंबोर्या : ६५०. खाडीची मासळी : सौंदाळे : २५०-६५०, खापी : २५०-३००, नगली : ५५०-६००, तांबोशी : ४४०-४८०, पालू : २४०-२८०, लेपा : ३००-३५०, बांगडा : २००-२५०, शेवटे : २००-२५०, पेडवी : १००-१२०, बेळुंजी : २००-२५०, तिसऱ्या : ३००-३५०, खुबे : १२०-१५०, तारली : १६०-१८०. नदीतील मासळी : रहू : १६०-२००, कतला : १८०-२४०, मरळ : ४५०-५५०, शिवडा : ३००, खवली : ३००, आम्ळी : १२०-१८०, खेकडे : ३००-४००, चिलापी : ८०-२००, वाम : ६००. मटण : बोकडाचे ७६०, बोलाईचे ७६०, खिमा ७६०, कलेजी ८००. चिकन २२०, लेगपीस २७०, जिवंत कोंबडी १५०, बोनलेस ३२०. अंडी : गावरान (शेकडा) ११२०, डझन १४०, प्रतिनग १२. इंग्लिश (शेकडा) ५४५, डझन ७८, प्रतिनग ६.५०.




