Pune: आमदार सुनील कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त सामुदायिक आरोग्य शिबिराचे आयोजन

पुणे : कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील कांबळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने उद्या (दि. १० सप्टेंबर) रोजी कॅम्प परिसरातील नागरिकांसाठी मोफत सामुदायिक आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यस्तरीय विशेष सहाय्यता कक्षाद्वारे हे शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
आमदार कांबळे यांच्याकडून मागील पाच वर्षात वेगवेगळया आरोग्य शिबिराद्वारे हजारो नागरिकांना मोफत उपचारांची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच करोना संकटाच्या काळात नागरिकांना वैद्यकीय सेवेसह आमदार निधीतून कॅम्प भागातील शासकीय रूग्णालयांसाठी विशेष निधीही उपलब्ध करून देण्यात आला आहे. सकाळी ९ ते दुपारी १ या कालावधीत हिंद तरूण मंडळ ट्रस्ट येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
भारतीय जनता पार्टी कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष सुशांत निगडे व सर्व नगरसेवक पदाधिकारी,बालाजी ट्रेडर्स चे मल्हारी नरवडे,राज्यस्तरीय वैद्यकीय विशेष सहाय्यता कक्षाचे जिल्हा सदस्य सिद्धार्थ गिरमे,स्थानिक नगरसेवक दिलीप गिरमकर, बै.जे शासकीय महाविद्यालय, ससून सर्वोपचार रुग्णालय व धर्मादाय सहआयुक्त कार्यालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने हे शिबीर होणार असून या भागातील जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार सुनील कांबळे मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.





