Pune : निवासी शाळांमध्ये प्रवेशासाठी संधी

पुणे : अनुसूचित जाती व नवबौद्ध मुला-मुलींना पुणे जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या शासकीय निवासी शाळेत प्रवेशासाठी संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
दिवे (ता. पुरंदर), तरंगवाडी (ता. इंदापूर), पेठ (ता. आंबेगाव) ,तसेच मुलींची शासकीय निवासी शाळा चांडोली (ता. खेड) येथे २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झा आहे. या शाळा ६ वी ते १० वीपर्यंत आहेत.
निवासी शाळांमध्ये अनुसूचित जातींसाठी ८० टक्के, अनुसूचित जमाती १० टक्के, विमुक्त व भटक्या जमाती ५ टक्के, विशेष मागास २ टक्के अणि दिव्यांगांसाठी ३ टक्के जागा आरक्षित ठेवल्या आहेत.
या शाळांमध्ये ई-लर्निंग, अनुभवी व तज्ज्ञ शिक्षक, सेमी इंग्रजी व मराठी अशा दोन्ही माध्यमांमध्ये शिकविले जाते. मोफत भोजन व निवासाची सोय, विविध खेळ व स्पर्धांचे मार्गदर्शन करण्यात येते, असे समाजकल्याण सहायक आयुक्त प्रसाद खैरनार यांनी सांगितले.





