Pune : भूमि अभिलेख विभागात ऑनलाइन अपिल दाखल करता येणार

पुणे : भूमि अभिलेख विभागातील अपिलांच्या सुनावणीसाठी आॉनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी प्रत्यय ही प्रणाली राज्यात लागू करण्यात आली आहे. त्यानुसार भूमि अभिलेख विभागातील तालुक्यातील उप अधिक्षक , जिल्हा अधिक्षक ते विभागीय स्तरावरील उप संचालक, अप्पर मुख्य सचिव (अपिल), या अधिकाऱ्यांकडे आॉनलाईन पद्धतीने अपिल दाखल करता येणार आहे. अपिल, अर्ज दाखल केल्यानंतरची सद्यस्थिती, नोटीस, सुनावणीची तारीख आणि निकाल सुध्दा नागरिकांना आॉनलाइन उपलब्ध होणार आहे. या सुविधेमुळे नागरिकांचा मोठा वेळ वाचणार आहे.
राज्यात आॉनलाइन सुविधा देण्यामध्ये अग्रेसर असलेल्या भूमि अभिलेख विभागाने त्यामध्ये आणखी एका सुविधेची भर घातली आहे. प्रत्यय या प्रणालीचा शुभारंभ नुकताच राज्याचे महसुलमंत्री चंदशेखर बावनकुळे यांच्या हस्ते मुंबई येथे करण्यात आला. यावेळी महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार, प्रधान सचिव संतोष कुमार, जमाबंदी आयुक्त डॉ. सुहास दिवसे, विभागीय आयुक्त विजय सूर्यवंशी, उपसंचालक राजेंद्र गोळे आदी मान्यवर उपस्थित होते.
भूमि अभिलेख विभागाने १०० दिवसांमध्ये जे उद्दिष्ट दिले होते ते वेळेत पूर्ण केले, याबद्दल राज्याचे जमाबंदी आयुक्त डॉ. दिवसे आणि भूमि अभिलेख विभागातील अधिकाऱ्यांचे बावनकुळे यांनी अभिनंदन केले. यावेळी बावनकुळे यांनी सांगितले की, भूमि अभिलेख विभागाचा कारभार पेपरलेस होण्यासाठी ही प्रणाली उपयोगी ठरणार आहे. प्रत्यय प्रणालीमुळे भूमि अभिलेख विभागातील तालुका ते जिल्हा, जिल्हा ते विभागीय आणि विभागीय ते शासन स्तर या सर्व टप्प्यांसाठी आॉनलाइन अर्ज दाखल करणे शक्य झाले आहे.
पुढील टप्प्यात सुनावणीसाठी आॉनलाइन उपस्थित राहण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. या सुविधेमुळे अपिलांची सद्यस्थिती, रोजनामा, निकाल पत्र रिअल टाईम उपलब्ध झाले आहे. शासन स्तरावर भूमि अभिलेख विभागाकडील सुमारे ११ हजार अपिल प्रलंबित आहेत. काही अपिले ही २०१२ पासूनची आहेत. ही अपिले सुध्दा लवकर निकाली काढण्यात येतील.
प्रत्यय प्रणालीची वैशिष्टे
– नागरिकांना फेरफार, तक्रारी, अपील, पुनर्विलोकन अर्ज आॉनलाइन दाखल करता येणार.
– अर्ज, अपिल यांची सद्यस्थिती, सुनावणीचा दिनांक व वेळ, विरुद्ध पक्षाचे म्हणणे सर्व काही आॉनलाइन पहाता येणार.
– दिवाणी न्यायालयाप्रमाणे पुढील टप्प्यात आॉनलाइन सुनावणीची सुविधा सुद्धा उपलब्ध केली जाणार.
– घरबसल्या अपिलदार, जबाबदार आणि





