पुणे : गुढी पाडवा मुहूर्त, नवीन वर्षाची सुरूवात आणि ईदच्या पूर्वसंध्येचे औचित्य साधून भारतीय जनता पक्ष अल्पसंख्याक ‘सौगत-ए-मोदी’ अभियान राबवून सामाजिक संदेश देण्याचा अनोखा उपक्रम साजरा केला. गरीब मुस्लिमांना अभिमानाने ईद साजरी करता यावी यासाठी त्यांना एक किट ही भेट देण्यात आले. यावेळी भाजप अल्पसंख्याक मोर्चा पुणे अध्यक्ष इम्तियाज मोमीन, भाजपा संघटक गणेश घुले, भाजपा हडपसर विधानसभा अध्यक्ष संदीप दळवी, अकील मामु शेख आदी उपस्थित होते. भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष इम्तियाज मोमीन म्हणाले की, ईद, भारतीय नववर्ष पार्श्वभूमीवर भाजप ही मोहीम राबवत आहे. असे अनेक अल्पसंख्याक आहेत जे आपले सण व्यवस्थित साजरे करू शकत नाहीत. अशा परिस्थितीत भाजपने त्यांच्यासमोर ‘सौगत-ए-मोदी’ हा अनोखा उपक्रम सादर केला आहे. याशिवाय शहरस्तरावर ईद मिलन कार्यक्रमही रमजान काळात मोठ्या प्रमाणात आयोजित केले आहेत. मुस्लिम समुदायासाठी च्या योजनांना प्रोत्साहन देण्यासाठी ही मोहीम चालविली जाऊ शकते जेणेकरून सामाजिक सलोखा निर्माण होण्यास मोठा पाठिंबा मिळेल. यावेळी बोलताना भाजप हडपसर विधानसभा अध्यक्ष संदीप दळवी म्हणाले की, रमजानच्या पवित्र महिन्यात ईदपूर्वी भाजपचा हा प्रचार अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. या अभियानाच्या माध्यमातून भाजपला मुस्लीम कुटुंबांपर्यंत पोहोचता आले. सौगत-ए-मोदी किटमध्ये कपडे, शेवया, खजूर, शेंगदाणे, मिठाई आणि साखर आहे. याशिवाय महिलांना देण्यात येणाऱ्या किटमध्ये सूट क्लॉथ आणि पुरुषांच्या किटमध्ये कुर्ता पायजमा कापड आहे. भाजपकडून सौगत-ए-मोदी कार्यक्रमांतर्गत हडपसरमधील २०० गरजूंना किटचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अकील मामु शेख यांनी केले. प्रणव शिवशरण, राजू कांबळे, संतोष गायकवाड, गौस पटेल, स्वप्नील शिंदे, समीर शेख, मनीष विश्वकर्मा, अमर घेंघट, मंजूर शेख, असिफ खान, हसीम छपरबंद, शाबान शेख, बबलू पिरजादे, परशुराम वाघ आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.