Pune : जीबीएसची रुग्णसंख्या १३० वर

पुणे : राज्यात आज नव्याने गुलेन बॅरे सिंड्रोमचे (जीबीएस) तीन रुग्ण सापडले. त्यामुळे बाधित रुग्णसंख्या १३० वर पोहोचली आहे. त्यातील २० रुग्ण व्हेंटिलेटवर आहेत. दरम्यान, गेल्या २४ तासांत जीबीएस बाधित रुग्णसंख्या कमी होताना दिसत आहे. नागरिकांनी घाबरून न जाता खबरदारी घ्यावी. पाणी उकळून गार करून प्यावे, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
बाधित रुग्णांपैकी ७३ रुग्णांचे जीबीएस निदान निश्चित झाले आहे. १३० रुग्णांपैकी २५ रुग्ण पुणे महापालिका, ७४ रुग्ण महापालिका समाविष्ट गावांतील, १३ रुग्ण पिंपरी-चिंचवड महापालिका, ग्रामीण ९, तर इतर जिल्ह्यांतील ९ रुग्णांचा समावेश आहे.
जीबीएसमुळे आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. दरम्यान, आतापर्यंत पुणे महापालिका क्षेत्रातील ३७ हजार ८०३, पिंपरी-चिंचवड क्षेत्रातील ९ हजार ६९, तर ग्रामीणमधील ११ ह्जार ३७३ घरांचे सर्व्हेक्षण करण्यात आले आहे.
वयोमानानुसार रुग्णसंख्या
वय एकूण रुग्णसंख्या
० ते ९ २२
१० ते १९ १९
२० ते २९ ३०
३० ते ३९ १६
४० ते ४९ १३
५० ते ५९ १८
६० ते ६९ १२





