पुणे- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्यांचा संप दीड महिन्यानंतरही कायम आहे. शुक्रवारी आणखी 54 कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आल्या.
एसटीच्या संपात पुणे विभागाचे काम देखील अंशत: सुरू असून, अद्यापही सुमारे अडीच हजारांहून अधिक कर्मचारी संपात सहभागी आहेत. विभागातील शिवाजीनगर, स्वारगेट, दौंड, शिरूर, बारामती, बारामती एमआयडीसी, पिंपरी-चिंचवड, इंदापूर आणि भोर आगारांतून काही बसेस धावत आहेत. प्रशासनाने आवाहन करून देखील कर्मचारी रूजू न झाल्याने महामंडळाने कारवाईचा बडगा उगारला आहे. बदली, सेवासमाप्ती पाठोपाठ आता कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात येत आहे. बडतर्फ करण्याबाबतच्या कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात येत आहेत. दरम्यान, शुक्रवारी सायंकाळपर्यंत सुमारे 150 हून अधिक बसेसचे संचलन झाले. यामध्ये शिवशाही, शिवनेरी आणि साध्या बसेसचा समावेश आहे.