वाघोली : वाघोली येथील बकोरी रोड येथे रिलायन्स फ्रेश, मिठाई जंक्शन स्वीट होम ते जेएसपीएम कॉलेज मेन गेट दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूस नो पार्किंग करण्यात आली आहे. पुणे पोलीस वाहतूक विभागाचे उपायुक्त विजयकुमार मगर यांनी तात्पुरत्या स्वरुपात आदेश काढले आहेत.
नो पार्किंगच्या आदेशाबाबत नागरिकांच्या हरकती व सूचना असल्यास १० सप्टेंबर पर्यंत येरवडा येथील वाहतूक विभागाच्या कार्यालयात लेखी स्वरुपात सादर करण्यास सांगण्यात आले आहे. हरकती व सूचनांचा विचार करून पुढील अंतिम आदेश काढले जाणार आहे. यामध्ये अत्यावश्यक पोलीस, रुग्णवाहिका, फायरब्रिगेड सेवेतील वाहंनाना वगळण्यात आले आहे.
वाघोली मधील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या वाहतूक शाखेने पार्किंग झोन देखील जाहीर करण्यासाठी पाठपुरावा करावा. वाहतुकीस अडथळा ठरणारे विजेचे खांब काढून टाकण्यासाठी कार्यवाही करावी.
– रामभाऊ दाभाडे,माजी सदस्य, जिल्हा परिषद पुणे