पुणे – पुणे व पिंपरी चिंचवड शहरांतील वृत्तपत्र विक्रेत्यांची प्रमुख संघटना असलेल्या पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाचा 38 वा वर्धापनदिन दि. 30 डिसेंबर रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. या संघटनेत सुमारे 2,500 वृत्तपत्र विक्रेते सदस्य आहेत. पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाचे सदस्य गेली 38 वर्षे अथकपणे घरोघरी वृत्तपत्र वितरण करत आहेत. दरम्यान, संघटनेच्या 38 व्या वर्धापन दिनानिमित संघटनेच्या सर्व विभागांत पेढे वाटून आणि केक कापून आनंद साजरा करण्यात आला. तसेच पुणे येथील मुख्य कार्यालयात संघटनेचे विश्वस्त संदीप शिंदे अणि त्यांच्या पत्नी यांच्या हस्ते सत्यनारायण महापूजा करण्यात आली. तसेच यावेळी स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला. यावेळी संघटनेचे अध्यक्ष विजय छबुराव पारगे, दत्तात्रय पिसे, वरिष्ठ उपाध्यक्ष अरुण निवंगुणे, सचिव अनंत भिकुले, कार्याध्यक्ष संजय भोसले, खजिनदार विश्वस्त बाळासाहेब काळे, संतोष लोहार, प्रवीण माने, बापू वाळके, यशवंत वादवणे, यतीन चौधरी, राजू रसाळ, सुनील पवार, सचिन मुंगारे, सुनील बरके, वसंत घोटकुले, सलीम सय्यद आणि सर्व विभागांमधील विभागप्रमुख व पदाधिकारी, वाचक, विक्रेते बंधू-भगिनी व सर्व वृत्तपत्रांचे व्यवस्थापन अधिकारी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. पुणे येथील मुख्य कार्यालयातील कार्यक्रमाचे नियोजन आप्पा बळवंत चौक विभागातील कार्यकारिणी सदस्यांच्यावतीने करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी वृत्तपत्र विक्रेत्यांच्या अथक परिश्रमाचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या.