प्रभात वृत्तसेवा पिंपरी – उसन्या पैशांवरून वाद होऊन दोघांवर कटरने वार करीत दोन भावांवर खुनी हल्ला करण्यात आला. ही घटना विकास कॉलनी, लांडेवाडी येथे रविवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास घडली.अनिल बवन घोलप (वय ५०, रा. आळंदी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. ऋषिकेश शरद कुबल (वय ३८, रा. मांजरी, पुणे) व राहूल कुबल अशी जखमी झालेल्या भावांची नावे आहेत. ऋषिकेश यांनी रविवारी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी फिर्यादी ऋषिकेश व त्यांचा भाऊ राहूल हे दोघेजण लांडेवाडी, भोसरी येथे आपल्या सदनिकेची साफसफाई करण्यासाठी आले होते. त्यावेळी तिथे आलेल्या आरोपी अनिल घोलप याने पैशांच्या वादातून “तुला आता जिवंत सोडत नाही” म्हणत कटरने गळ्यावर वार केला. तसेच भावाच्या गालावरही कटरने वार करीत दोघांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. भोसरी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.