पुणे : दि पुणे लॉयर्स कन्झ्युमर्स को-ऑपरेटीव्ह सोसायटी लि.च्या चेअरमनपदी ॲड. सुनील बाळासाहेब बहिरट यांची निवड झाली आहे. राज्यात वकिलांकडून वकिलांसाठी चालवली जाणारी ही एकमेव संस्था आहे. १९६१ मध्ये या संस्थेची स्थापना झाली. सध्या जिल्ह्यातील ९ हजार ५०० वकील संस्थेचे सभासद आहेत. स्टॅम्प, ई-फायलिंगसह वकील व पक्षकारांसाठी लागणारे सर्व साहित्य येथे मिळते. लवकरच आपण पदभार स्विकारणार असून वकिलांच्या हिताला आपले प्राधान्य असेल, असे ॲड. बहिरट यांनी निवडीनंतर सांगितले.