SP’s Biryani House : पुण्यातील अग्रेसर बिर्याणी हाऊस म्हणून सर्वत्र ठाऊक असलेले आणि प्रत्येक बिर्याणी लव्हर्सच्या जिभेवर आणि मनात ठसलेले एसपी’ ज् बिर्याणी हाऊसने यंदा आपला ३२वा वर्धापनदिन मोठ्या दिमाखात साजरा करीत ३३व्या वर्षात पदार्पण केले. या वर्धापनदिनी प्रमुख अतिथी म्हणून आयपीएस् रावले ( डीसीपी झोन १ ), प्रथमेश, प्रसाद वाघचौरे-देशमुख, आयआरएस डॉ. संदीप साठे सर (जॉईंट कमिशनर इन्कम टॅक्स), बाळासाहेब अमराळे व इतर मान्यवरांची उपस्थिती लाभली. जगभरच्या अस्सल बिर्याणींची चव असो, लाजवाब असा बिर्याणी फेस्टिव्हल असो इथल्या बिर्याणींची ज्जत अगदी मोठमोठ्या सेलिब्रेटींपासून ते अनेकांनी चाखली आहे. Chicken Biryani इथल्या बिर्याणीचं वैशिष्ट आणि वेगळेपण हेच आहे की, बिर्याणीत वापरलेला प्रत्येक पदार्थ मग तो लांबसडक दाणेदार तांदूळ असो वा अव्वल दर्जाचे मसाले, उत्कृष्ट प्रतीचे नॉनव्हेज असो वा अस्सल साजूक तूप सर्वच उच्च दर्जाचे असते. पदार्थांची अस्सल चव आणि गुणवत्ता याबाबत इथे कधीही तडजोड केली जात नाही. यामुळेच तर बिर्याणी म्हणलं की सर्वांसाठीच एसपीज् हे नाव सर्वात वरती असते. १९९४ पासून अगदी छोट्या प्रमाणात सुरू झालेले हे बिर्याणी हाऊस तुमच्या उदंड प्रतिसादाने भरभराट पावत आहे. इथल्या मलमल मटण दम बिर्याणी, कराची, अफगाणी, लखनवी, दुबई, आंध्रा यासारख्या अनेक उत्तमोत्तम बिर्याणी स्वादखातिरदारी तर करीत आहेतच पण सर्व बिर्याणीप्रेमींना १००% अस्सल बिर्याणीचा आनंदही देत आहेत. बिर्याणी हाऊस असले तरी इथे अनेक इतर व्हेज नॉनव्हेज पदार्थांनाही खवैयांचा सदैव भरभरून प्रतिसाद मिळत आहे.