Pune News : सामाजिक बांधिलकी जपत गेल्या १८ वर्षांपासून सातत्याने (Pune News) आयोजन करणाऱ्या सिध्दी फाऊंडेशनतर्फे यंदा २१ मे रोजी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे़. उन्हाळ्यात रक्ताचा तुटवडा जाणवत असल्यामुळे ही उणीव भरुन काढण्यासाठी सिध्दी फाऊंडेशनने पुढाकार घेतला आहे़. या उपक्रमामुळे गेल्या अनेक वर्षांमध्ये विविध रुग्णालये आणि वैद्यकिय केंद्रांना अत्यावश्यक (Pune News) रक्तपुरवठा होवून असंख्य रुग्णांना जीवनदान मिळाले आहे़ यावर्षी वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर रक्तदात्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेत शिबीराचे नियोजन करण्यात आले आहे़. रक्तदान प्रक्रियेदरम्यान कोणालाही कोणतीही अडचण निर्माण होवू नये यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली़. Pune News रक्तदान शिबीर येत्या गुरुवारी दि़ २१ मे रोजी सॅलीसबरी पार्क येथील महावीर प्रतिष्ठान येथे सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत आयोजित केले आहे़ सिध्दी फाऊंडेशनचे संस्थापक मनोज छाजेड आणि अध्यक्ष ललित जैन यांनी नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे़. तुमच्या एका रक्तदानामुळे एखाद्याच्या आयुष्यात पुन्हा आशेचा सुर्योदय होवू शकतो़ असा भावनिक संदेश देत त्यांनी या जीवनदायी उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे़. समाजहितासाठी सातत्याने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचे विविध स्तरातून कौतूक होत असून, यंदाच्या शिबीरालाही नागरिकांचा प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे़ रक्तदान शिबीर हे केवळ दान नसून एखाद्याला नवजीवन देण्याचे प्रवित्र कार्य आहे़ गेल्या १८ वर्षात समाजाने दिलेल्या प्रेम आणि सहकार्यामुळेच हा उपक्रम अधिक व्यापक झाला असून यंदाही मोठ्या संख्येने रक्तदाते सहभागी होतील असा विश्वास आहे़ – मनोज छाजेड संस्थापक सिध्दी फाऊंडेशन वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर रक्तदात्यांच्या सुरक्षिततेला आम्ही सर्वाेच्च प्राधान्य दिले आहे़ प्रत्येक रक्तदात्याला योग्य सुविधा आणि काळजी मिळेल़ याची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे़ समाजातील प्रत्येकाने या जीवनदायी मोहिमेत सहभागी व्हावे़ – ललित जैन अध्यक्ष सिध्दी फाऊंडेशन