प्रभात वृत्तसेवा पुणे – मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पुणे जिल्हा समितीचे सदस्य, जातिअंत संघर्ष समितीचे पुणे जिल्हा अध्यक्ष आणि जन आरोग्य मंचचे पुणे जिल्हा अध्यक्ष कॉ. डॉ. किशोर खिलारे यांचे मध्यरात्री निधन झाले. ते ६२ वर्षांचे होते. त्यांच्या कन्या परदेशात असल्याने त्या आल्यानंतर बुधवारी (दि. २६) सकाळी ११.३० वाजता त्यांच्या डॉ. खिलारे यांचा अंत्यविधी वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे.