प्रभात वृत्तसेवा पुणे – एक ते पाच पटसंख्या असणाऱ्या शाळा तात्काळ बंद करून त्या शाळांमधील विद्यार्थ्यांचे समायोजन नजीकच्या शाळेत करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाकडून घेण्यात आला आहे.वाढत्या खासगी शाळांमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, शासकीय व अनुदानित शाळांची खासगी शाळांमध्ये स्पर्धाही वाढल्याने बहुसंख्य शासकीय शाळांत पटसंख्या कमी होत चालली. ग्रामीण भागात कमी पटसंख्येच्या शाळाही वाढल्या आहेत. त्यामुळे अन्यत्र समावेश झालेल्या विद्यार्थ्यांना आवश्यक असल्यास वाहतूक भत्ता दरमहा ६०० रुपये देण्याबाबतची कार्यवाही करावी लागणार असल्याचे शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.