प्रभात वृत्तसेवा सोरतापवाडी – टिळेकरवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सौ. कल्पना श्रीकांत टिळेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.वैशालीताई चौरे यांनी ठरलेल्या कालावधीत आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर उपसरपंचपद रिक्त झाले होते. या रिक्त पदासाठी घेण्यात आलेल्या निवडणूक प्रक्रियेत सौ. कल्पना टिळेकर यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने सरपंच गोवर्धन टिळेकर व ग्रामविकास अधिकारी प्रवीण खराडे यांनी त्यांच्या बिनविरोध निवडीची अधिकृत घोषणा केली. या बिनविरोध निवडीमुळे गावातील सौहार्दपूर्ण राजकीय परंपरा कायम राखली गेली असल्याचे मत यशवंत सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाइस चेअरमन राजेंद्र टिळेकर यांनी व्यक्त केले. यावेळी माजी सरपंच सुभाष लोणकर, माजी सरपंच गणेश टिळेकर, सुशील राऊत, माजी उपसरपंच सुषमा टिळेकर, नंदा राऊत, वैशालीताई चौरे, सोसायटीचे चेअरमन अक्षय टिळेकर, लक्ष्मण टिळेकर, सुभाष टिळेकर, बाळासाहेब चौरे, रोहिदास टिळेकर, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अमर टिळेकर, म हेश टिळेकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावातील निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी राजेंद्र टिळेकर, संतोष टिळेकर तसेच पोलीस पाटील विजय टिळेकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.नवनिर्वाचित उपसरपंच कल्पना टिळेकर यांनी निवडीनंतर बोलताना सांगितले की, गावाच्या विकासकामांसाठी गट-तट बाजूला ठेवून सर्वांना विश्वासात घेऊन काम करण्यात येईल. ग्रामविकास हा माझा प्रमुख उद्देश राहील.