Pune News: पुणे महापालिकेच्या 58 व्या महापौर पदी मंजुषा नागपुरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तर उपमहापौर परशुराम वाडेकर यांचीही बिनविरोध निवड झाली आहे. या निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून अर्ज दाखल करण्यात आले होते. मात्र, अर्ज माघारी घेण्याची विनंती भाजपकडून या दोन्ही पक्षांच्या नेत्यांना करण्यात आली होती. अखेर या दोन्ही पक्षांनी माघार घेतल्याने ही निवड बिनविरोध झाल्याचे पीठासन अधिकारी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी जाहीर केले. विशेष म्हणजे नागपुरे या महापालिकेच्या निवडणुकीत बिनविरोध म्हणून निवडून आलेल्या पहिला महिला नगरसेविका असून प्रभाग 35 मधून त्या निवडून आल्या आहेत. दरम्यान, महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्यासह सर्व अधिकारी, नवनिर्वाचित नगरसेवक यावेळी उपस्थित होते. यावेळी भाजपकडून आधी जाहीर केल्यानुसार कोणताही जल्लोष करण्यात आला नाही. Pune News हेही वाचा: Online Games: ऑनलाइन गेमिंगमुळे मेंदूला झटका ; रक्तदाबामुळे मेंदूची नस फुटल्याने २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू