Pune News : पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथकाने पुरंदर तालुक्यातील (Pune News) मांडकी येथे धडक कारवाई करत तब्बल ५६० किलो चंदन साठा जप्त केला. या कारवाईत अंदाजे २८ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. मांडकी येथील एका शेतामध्ये हिरव्या कापडाखाली लपवून ठेवलेले (Pune News) चंदनाचे ओंडके, बॅटरीवर चालणारा कटर व दोन लोखंडी ड्रिल पोलिसांना आढळून आले. हा साठा चोरीचा असून विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणी प्रतिक प्रमोद खुंटे (रा. मांडकी, ता. पुरंदर) याच्याविरुद्ध जेजुरी पोलीस ठाण्यात बीएनएस कलम ३०३(२), भारतीय वन अधिनियम तसेच महाराष्ट्र वृक्षतोड अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे. Pune News ही कारवाई पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, बारामती अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार व जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. दहशतवाद विरोधी पथकाचे (Pune News) सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेश गायकवाड, विशाल गव्हाणे, पोलीस हवालदार निलेश कदम, रविंद्र जाधव, पोलीस अंमलदार मोसीन शेख, ओंकार शिंदे, जालिंदर मुळीक तसेच जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक केशव जगताप यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वी केली.