Pune News : पुण्यातील (Pune News) मांजरी आणि हडपसर परिसरात दहशतवादी विरोधी पथकाने गुरुवारी मध्यरात्री मोठी कारवाई करत विविध ठिकाणी छापेमारी केली. या कारवाईत (Pune News) एटीएससह स्थानिक पोलीस, गुन्हे शाखा आणि केंद्रीय यंत्रणांचे अधिकारी सहभागी झाल्याची माहिती समोर आली आहे. अचानक सुरू झालेल्या या हालचालींमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संशयित हालचाली आणि काही तांत्रिक माहितीच्या आधारे एटीएसने मांजरीतील काही ठिकाणांवर धाड टाकली. त्यानंतर हडपसर परिसरातील (Pune News) काही ठिकाणीही तपास मोहीम राबविण्यात आली. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या कारवाईदरम्यान अनेक संशयितांची चौकशी करण्यात आल्याचे समजते. Pune News छापेमारीदरम्यान काही इलेक्ट्रॉनिक उपकरणे, मोबाईल फोन, कागदपत्रे आणि डिजिटल पुरावे तपासासाठी जप्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मात्र, अधिकृतरीत्या कोणतीही अटक किंवा गुन्हा नोंद झाल्याबाबत उशिरापर्यंत स्पष्ट माहिती देण्यात आलेली नव्हती. मांजरी परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. काही भागांत नागरिकांची ये-जा मर्यादित करण्यात आली होती. पथकांनी अनेक तास तपास मोहीम सुरू ठेवली. स्थानिक नागरिकांमध्ये भीती आणि उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, एटीएसकडून या कारवाईबाबत (Pune News) अधिकृत निवेदन अद्याप जारी करण्यात आलेले नाही. तपास संवेदनशील असल्याने अधिकारी माहिती देण्यास टाळाटाळ करत असल्याचे दिसून आले. प्राथमिक तपासानंतरच कारवाईमागील नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.