Pune News : पाटबंधारे विभागाची ९३२ कोटी ८८ लाख रुपयांची थकबाकी १५ दिवसांत न भरल्यास खडकवासला धरणातून शहराला दिले जाणारे पाणी बंद करण्याचा इशारा जलसंपदा विभागाने महापालिकेस दिला आहे. मात्र, जलसंपदा विभागाने आकारलेली थकबाकी रक्कमच चुकीची असून, त्याविरोधात महापालिकेकडून वारंवार जलसंपदा विभागास पत्राद्वारे अवगत केले असूनही महापालिकेच्या पत्रांना केराची टोपली दाखविल्याचे समोर आले आहे. थकबाकी, तसेच बिलाच्या आकारणीबाबत महापालिकेने जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाकडे प्रतिज्ञापत्र सादर करूनही महापालिकेचे पाणी बंद करण्याचा इशारा दिल्याची बाब चुकीची असल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. व्यापारी वापर अवघा दीड टक्का जलसंपदा विभागाकडून महापालिकेस पाठविण्यात आलेल्या पाण्याच्या बिलात शहरातील १५ टक्के पाणी वापर औद्योगिक, तसेच ५ टक्के वापर व्यापारी असल्याचे नमूद करत २० टक्के पाण्याला व्यावसायिक दर लावले आहेत. मात्र, प्रत्यक्षात महापालिकेचा एकूण व्यापारी पाणी वापर दीड टक्केच आहे. शहरात केवळ ९६८८ व्यापारी नळजोड असून, त्यातून वर्षाला केवळ २६ एमएलडी पाणी दिले जाते. व्यापारी पाण्याचा दर ३ रुपये ३ पैसे प्रतिघन मीटर असताना, मंजूर कोट्यापेक्षा अधिक पाणी वापरत असल्याचे सांगत पाटबंधारे विभागाने २० टक्के पाणी वापरला प्रतिघन मीटर ३० रुपये २५ पैसे दर आकारला आहे. त्यामुळे दरवर्षी ५६ कोटींचे अतिरिक्त बिल गेल्या ९ वर्षांपासून दिले जात असून, ते दुरुस्त करण्याबाबतचे पत्र अनेकदा जलसंपदा विभागाला देऊनही त्याकडे दुर्लक्ष केल्याचा प्रशासनाचा दावा आहे. एसटीपीसाठी वर्षाला १०० टक्के दंड महापालिकेकडून सांडपाणी १०० टक्के शुद्ध केले जात नसल्याचे सांगत जलसंपदाने एसटीपीच्या दंडापोटी पालिकेला वर्षाला ५५ कोटींचा दंड आकारला आहे. प्रत्यक्षात शहरात निर्माण होणाऱ्या सांडपाण्यातील सुमारे ४७७ एमएलडी (५० टक्के) पाण्यावर प्रक्रिया केली जाते. २०१६ पासून महापालिकेकडून शहरातील १०० टक्के सांडपाणी स्वच्छ करण्यासाठी जायका प्रकल्पही राबविला आहे. त्यामुळे जलसंपदाने सांडपाणी शुद्ध न केल्याचा दंड आकारू नये, अशी महापालिकेची भूमिका असून, महापालिका प्रक्रिया करत असलेल्या ५० टक्के दंडाची रक्कम कमी करावी, अशी मागणी केली आहे. मात्र, त्याला उत्तर न देता दंड आकारणी सुरूच असल्याचे प्रशासनाचे मत आहे. Suresh Dhas : वाल्मिक कराडच्या बंगल्यातील व्यक्तींची नार्को चाचणी करण्यात आली; सुरेश धस यांचा दावा