पुणे – महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुण्यासाठी ससून रुग्णालय येथे मुख्यमंत्री सहाय्यता निधी चे मध्यवर्ती मदत व मार्गदर्शन केंद्र सुरु करण्यात यावे अशी मागणी आमदार सुनिल कांबळे यांनी केली आहे.
पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या ससून सर्वोउपचार रुग्णालयात असंख्य गोरगरीब रुग्ण उपचारांसाठी महाराष्ट्रभरातून दाखल होत असतात, तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधी च्या फॉर्म साठी लागणाऱ्या ससून शासकीय रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांच्या सही शिक्क्यासाठी असंख्य रुग्णांची रांग त्याठिकाणी दररोज असते.
तरी या सर्वाचा विचार करता ससून सर्वोउपचार रुग्णालय येथे मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे पुणे शहर व जिल्हा म्हणून एक मध्यवर्ती मदत व मार्गदर्शन केंद्र सुरु करण्यात यावे. अशी मागणी सुनिल कांबळे यांनी केली आहे. जेणेकरून तेथे येणाऱ्या रुग्णांना योग्य ते मार्गदर्शन व मदत होईल. असं देखील ते म्हणाले आहेत.