पुणे – वानवडी परिसरात ऑक्टोबर महिन्यामध्ये रोहन प्रकाश अंगारके नामक व्यक्तीकडे पोलिस तपासा दरम्यान मेफेड्रॉन (एम डी) नामक अमली पदार्थ मोठ्या प्रमाणात आढळून आला होता. हा अमली पदार्थ आरोपी विकण्यासाठी जात असताना पोलिसांनी आरोपीस अटक केली व त्या सदर्भात वानवडी पोलीस स्टेशन येथे एन.डी.पी.एस कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला होता. आरोपीने ॲड अजित पवार व ॲड प्रणित नामदे यांच्या मार्फत जामीन अर्ज दाखल केला होता. पोलिसांनी कायद्यानुसार 60 दिवसाच्या आत दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करने गरजेचे होते. तसेच पोलिसांनी संबंधित आरोपी च्या विरुद्ध अधिकचा तपास करण्यासाठी मुदतवाढ मिळणेकामी न्यायालयात कुठलीही मागणी केलेली नाही. आरोपीला १७ ऑक्टोबर २०२५ रोजी अटक करण्यात आली आहे. ६० दिवसाचा कालावधी उलटला आहे. आरोपीला जामीन मिळणे त्याचा अधिकार आहे. असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवत जिल्हा व सत्र न्यायाधीश एस एस सस्ते यांनी सशर्त जामीन मंजूर केला. आरोपीतर्फे ॲड अजित पवार व प्रणित नामदे यांनी युक्तिवाद केला व त्यांना ॲड वेदांत म्हैसकर व अक्षय नामदे यांनी सहकार्य केले. “पोलिसांनी या गुन्ह्यात ६० दिवसाच्या आत दोषारोपपत्र दाखल केले नाही; त्यामुळे आरोपीला जामीन मंजूर करण्यात यावा असा युक्तिवाद न्यायालयात करण्यात आला”. – ॲड. अजित पवार