Pune News : डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवलमल फिरोदिया विधी महाविद्यालयात झालेल्या १८ व्या लोकमान्य टिळक राष्ट्रीय अभिरुप न्यायालय स्पर्धेत मराठवाडा मित्र मंडळाच्या शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालयाने विजेतेपद मिळवले. गोवा येथील इंडियन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ लीगल एज्युकेशनचा संघ उपविजेता ठरला. देशभरातील नामांकित २४ विधी महाविद्यालयांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता. या स्पर्धेत कॉर्पोरेट कायदा आणि परदेशी गुंतवणूक यांसारख्या क्लिष्ट विषयांवर आधारित खटल्यांचे सादरीकरण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी मांडलेले तर्कसंगत युक्तिवाद आणि सखोल संशोधनाने उपस्थितांची मने जिंकली. Supriya Sule : शरद पवारांची तब्येत कशी आहे? सुप्रिया सुळेंनी पोस्टद्वारे दिली हेल्थ अपडेट म्हणाल्या “बाबांना छातीत….” DES Shri Navalmal Firodia Law College स्पर्धेचे उद्घाटन प्रसिद्ध ॲड. एस. के. जैन यांच्या हस्ते झाले, तर समारोप समारंभाला मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती श्याम चांडक अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. यावेळी मराठवाडा मित्र मंडळाचे कार्याध्यक्ष भाऊसाहेब जाधव हे पाहुणे म्हणून उपस्थित होते. न्यायमूर्ती चांडक यांनी मूट कोर्ट स्पर्धांचे महत्त्व अधोरेखित केले. संस्थेचे अध्यक्ष प्रमोद रावत, उपाध्यक्ष ॲड. अशोक पलांडे आणि प्राचार्या डॉ. सुनीता आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे नियोजन करण्यात आले होते. वैयक्तिक पुरस्कारांमध्ये शिवानी तिवारी हिला सर्वोत्कृष्ट वक्ता, तर मुंबईच्या प्रवीण गांधी विधी महाविद्यालयाला सर्वोत्कृष्ट मेमोरियलचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. हेही वाचा: Top 10 news: जिल्हा परिषदा अन् पंचायत समित्यांमध्ये भाजपचं अव्वल, देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर सुनेत्रा पवारही दिल्लीत जाणार, अशा टॉप १० बातम्या वाचा एका क्लिकवर