पुणे : कात्रज कडून स्वारगेट कडे जाणाऱ्या भरधाव रुग्णवाहिकेच्या धडकेत एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्या ची दुर्दैवी घटना सोमवारी (दि.२४) दुपारी तीन वाजता कात्रज डेअरी शेजारी घडली, पांडुरंग वामन पंधेरे (वय ४८ वर्ष राहणार जांभूळवाडी रोड, दत्तनगर आंबेगाव) असे अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. या प्रकरणी रुग्णवाहिका चालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पांडुरंग पंधेरे हे कामा वरून घरी जात असताना कात्रज कडून येणाऱ्या भरधाव रुग्णवाहिका चालकाने वाहतुकीच्या नियमाकडे दुर्लक्ष करुन हलगर्जी व बेदरकारपणे वाहन चालवुन दुचाकी वरुन जात असलेल्या पंधेरे यांना जोरदार धडक मारुन गंभीर जखमी केले. गंभीर जखमी अवस्थेत पंधेरे यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.