प्रभात वृत्तसेवा पुणे – मुंढवा येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार संचालक असलेल्या अमेडिया कंपनीने मुदतवाढ मागितली आहे. खरेदी खताचे २१ कोटीचे मुद्रांक शुल्क भरण्यासाठी अमेडियाला दिलेली मुदत आज, सोमवारी संपली. कंपनीने आणखी पंधरा दिवसांची मुदवाढ मागितली आहे. त्याबाबत वकिलांमार्फत विभागास पत्र दिले आहे. मुदतवाढ देण्याबाबत उद्या, मंगळवारी निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती नोंदणी विभागाने दिली.मुंढवा येथील सरकारी ४० एकर जमीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीने परस्पर खरेदी केल्यानंतर या जागेच्या गैरव्यवहाराचे खूप मोठ्या प्रमाणावर पडसाद उमटले होते. यानंतर मुद्रांक शुल्क आणि नोंदणी विभागाने कंपनीला २१ कोटी रूपयांचे मुद्रांक शुल्क भरण्यासाठी सात नोव्हेबर रोजी नोटीस बजाविली होती. या नोटिशीला उत्तर देण्यासाठी १६ नोव्हेबरची दिली होती. मात्र ही मुद्त पंधरा दिवस वाढवून द्यावी असा अर्ज कंपनीने १४ नोव्हेबर रोजी मुंद्राक शुल्क आणि नोंदणी विभागाकडे दिला होता. मुद्रांक शुल्क आणि नोंदणी विभागाने २४ नोव्हेबर पर्यत मुदतवाढ दिली. मुद्रांक शुल्क भरण्यासाठी आतापर्यत दोनवेळा अमेडियाला मुदतवाढ दिली आहे. आता पुन्हा कंपनीने पंधरा दिवसांची मुदत वाढवून द्यावी असा अर्ज केला आहे.