Pune news – दि पुणे लॉयर्स कन्झ्युमर्स को-ऑपरेटीव्ह सोसायटी लि.च्या चेअरमनपदी ॲड. शरद मारूतीराव शेळके यांची निवड झाली आहे. राज्यात वकिलांकडून वकील आणि पक्षकारांसाठी चालवली जाणारी ही एकमेव संस्था आहे. १९६१ मध्ये या संस्थेची स्थापना झाली. सध्या जिल्ह्यातील सुमारे १० हजार वकील संस्थेचे सभासद आहेत. स्टॅम्प, ई-फायलिंगसह वकील व पक्षकारांसाठी लागणारे सर्व साहित्य येथे मिळते. ॲड. शरद शेळके यांनी यापूर्वी पुणे बार असोसिएशनचे सचिव व उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. पदभार स्विकारताच वकिलांच्या हिताला आपले प्राधान्य असेल, असे ॲड. शेळके यांनी सांगितले.